Nupur Daithankar : प्रत्येकाला स्वतःची स्पेस द्या; नुपूर दैठणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nupur Daithankar

Nupur Daithankar : प्रत्येकाला स्वतःची स्पेस द्या; नुपूर दैठणकर

मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की माझा जन्म अशा घरात झाला, जिथे संगीत आणि नृत्याचा वातावरण होतं. लहानपणापासून आई-वडिलांच्या रियाजाचे स्वर आणि नृत्य आमच्या डोळ्यासमोर सतत पडत राहिलं आणि ते बघतच आणि ऐकत मी आणि माझा भाऊ निनाद लहानाचा मोठे झालो.

आणि नकळत माझी पावलं नृत्याकडे वळली आणि माझा भाऊ निनाद संतूरकडे वळला. त्यामुळे आम्हालाही माहिती नव्हतं की आमचं करियर नकळतरित्या ठरलं गेलं किंवा ते संस्कार आमच्यावरती झाले. माझे वडील डॉ. धनंजय दैठणकर हे संतूरवादक आहेत तर आई डॉ. स्वाती दैठणकर ही भरतनाट्यम नृत्यांगना.

लहानपणापासून आम्ही बघतोय आई-वडिलांना कायम फक्त एक आर्टिस्ट म्हणून नाही तर एक माणूस म्हणून सगळे चढ-उतारा बघतो आहे. या करिअरमध्ये त्यांच्या सतत टूर्स असायच्या आणि ते बाहेर जायचे त्यावेळी त्यांना आलेले अनुभव, भेटणारे प्रेक्षक हे सगळे अनुभव आमच्या बरोबर ते शेअर करायचे आणि त्यातून आम्हाला खूप शिकता आला.

आम्ही त्यांच्याकडे संगीताची किंवा नृत्याची शिकवण न घेता एक माणूस म्हणून कसा असावा हे सुद्धा अतिशय त्यांच्याकडून शिकलो. त्यामुळे मला नक्कीच माझ्या आईमध्ये माझा गुरु भेटला. तिच्याकडून मला खूप गोष्टी शिकता आल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या टीचरकडे जेव्हा शिकता, तेव्हा फारतर आठवड्यातून दोन तास किंवा दिवसाला दोन तास तुम्ही जाऊन शिकता;

पण आईमध्येच मला गुरु मिळाल्यामुळे मला तिचा चोवीस तास सहवास मिळाला आणि त्याच्यातून खूप गोष्टी शिकता आल्या. त्याचबरोबर माझा भाऊ त्याच्याविषयी मला नक्की सांगायला आवडेल; कारण मी त्याच्याहून जरी वयाने पाच वर्षाने मोठे असले तरी मी म्हणेन की तो खूप जास्त माझ्यापेक्षा मॅच्युअर आहे.

कारण मला एका प्रसंग सांगायला आवडेल. आई-वडील कायम त्यांचे नृत्याचे आणि संगीताचे दौरे असायचे तेव्हा आम्ही लहान असताना ते अगदी दोन दोन महिने सुद्धा अमेरिकेच्या दौऱ्यावर असायचे आणि त्या वेळेला मी मोठी ताई तर मी पहिली तर तो माझ्याहून अजून लहान. एक कुठेतरी भावना निर्माण झाली की किंवा जबाबदारीची जाणीव झाली की आपल्या लहान भावाला सांभाळायचे आणि आपल्याला स्वतः स्ट्रॉंग त्यासाठी उभे राहायला पाहिजे;

कारण आई-वडील नाहीयेत तर त्यांची जागा घेऊन आपल्याला त्याला सांभाळायचे. वास्तविक पाहता आजी-आजोबा होते; पण तरीही अशी एक भावना आली की आपल्याला आई-वडिलांची आठवण येत असली तरी आपण ती दाखवायची नाही आणि आपल्या भावाला आपण सांभाळायचं. यूएस मध्ये गेल्यानंतर त्यावेळी एखादं कार्ड असायचं, त्या कार्डवर ठराविक मिनिट्स असायचे,

तेवढे मिनिट्स बोलता यायचं आणि आम्ही दोघेही आतुरतेने त्यांच्या फोनची वाट बघायचो. अशा पद्धतीने आमचं नातं त्यामुळे अतिशय दृढ होत गेलं तर त्याचं पूर्ण क्रेडिट मला माझ्या भावाला द्यायला लागेल निनादला; कारण तो वयाने लहान असूनही वास्तविक पाहता लोकांना वाटत होतं की ही किती छान सांभाळते तिच्या भावाला; पण खरंतर त्याने मला सांभाळलं आईवडील नसताना आणि एक मोठी ताई असल्याची एक जबाबदारी किंवा जाणीव मला करून दिली.

त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही नात्यांमध्ये एकमेकांविषयी असलेला आदर किंवा निरपेक्ष प्रेम किंवा सामंजस्य हे अतिशय महत्त्वाचा आहे. जसा मी म्हटलं की आम्ही चौघजण एका घरात राहत होतो किंवा एकत्र परफॉर्म सुद्धा करतो म्हणजे स्टेजवरती दोन संतूर लाइव्ह आणि दोन डान्स म्हणजे मी आणि आई डान्स लाइव्ह आणि बाबा आणि निनाद संतूर लाइव्ह असे परफॉर्म करतो.

यासाठी सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र बसून ठरवतो. कार्यक्रमानंतर कौतुक तर सगळे लोक करतात; पण प्रत्येकाला माहिती असतं की आपण आज आपल्या कॅपॅसिटीनुसार किती केलं किंवा आपण किती करू शकतो. आम्ही चौघही एकमेकांचे चांगले क्रिटीक आहोत; कारण कार्यक्रमानंतर आम्ही एकत्र बसतो आणि आजच्या प्रोग्राममध्ये कमी काय झालं, जे आपल्याला पुढच्या प्रोग्राममध्ये सुधारायचं आहे, यावर आम्ही चर्चा करतो.

वास्तविक पाहता माझं लग्न झालंय, मी दुसऱ्या घरात राहते. पण कितीही काही झालं तरी प्रोग्राम झाल्यानंतर मात्र आम्ही एकत्र येतो आणि सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करतो. एकत्र संवाद साधणं, हे हेल्दी रिलेशनसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि पुढच्या गोष्टी तुमच्या सुधारण्यासाठी. मला सांगायला आवडेल की माझं सौरभबरोबर अरेंज मॅरेज झालं.

माझ्या घरामध्ये संगीताचे वातावरण होते; पण जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझा नवरा या फिल्ड मधला नाही, तो एका आयटी कंपनीमध्ये काम करतो, ज्याला नक्कीच संगीताची किंवा नृत्याची तशी फारशी काही जाणीव नाही;

पण मला एवढंच हवं होतं की त्याने मला सपोर्ट करायला हवा किंवा त्या कलेविषयी त्याला रिस्पेक्ट असायला हवा, जे मला 100% मिळालं. मला सांगायला आवडेल ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की, ज्या वेळेला मला झी टीव्हीवर "बाजी" या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्यावेळेला माझं खरंतर लग्न ठरलेलं होतं आणि केवळ सौरभ मला म्हणाला की सिरीयल कर म्हणून मी केली.

विशेष म्हणजे स्वतःच्या लग्नात अन ते ही अरेंजमॅरेज असताना मी केवळ चार दिवस आले होते. विशेष म्हणजे लग्नानंतर मी सलग पुढचे नऊ महिने डे- नाईट शूट करत होते. त्यावेळी त्याने मला खूप सपोर्ट केला. फक्त तोच नाही तर त्याची फॅमिली, माझे सासू-सासरे आणि सौरभची बहिण प्रांजलने खूप पाठिंबा दिला. मला अगदी आठवतंय की आम्ही डे-नाईट शूट करायचं आणि त्या वेळेला अक्षरशः झोपायला सुद्धा मी रूमवरती नाही जायचे.

सौरभ शनिवार-रविवारी मला भेटायला आला तर तो रात्र-रात्र मॉनिटरच्या शेजारी डायरेक्टरच्या शेजारी बसून असायचा. खरंतर हे खरंच खूप क्रेडिटेबल आहे. कारण, मला असं वाटतं की एखाद्या नॉन आर्टिस्टने एवढा सपोर्ट करणं. कारण त्याला आधी माहिती होतं मी डान्सर आहे अन् त्याने ही गोष्ट स्वीकारली: पण अॅक्टिंगविषयी त्याला फारसं माहिती नव्हतं.

लग्न ठरल्यानंतर ही मालिका आली आणि केवळ आज त्याच्या सपोर्टमुळे मी ती मालिका केली. आता आम्हाला एक लहान बाळ आहे रियांझ नावाचं, तो आता तीन वर्षाचा झालाय. कोरोनाकाळात मला दोन वर्ष चांगला वेळ मिळाला, तो मला त्याच्याबरोबर घालवता आला; पण त्यानंतर मला सौरभने खूप सपोर्ट केला.

तो म्हणाला, तुझ अक्टिंग व डान्सचं करिअर तू पुन्हा सुरू कर, मी सगळं सांभाळतो आणि आता तुम्ही बघताय की माझी सध्या 'माझी तुझी रेशीमगाठी' ही मालिका सध्या सुरु आहे. मी बेस पुण्यात ठेवलाय; कारण रियांझचे स्कूल पुण्यामध्ये आहे; त्यामुळे माझं अपडाऊन करणं चालू आहे. मला जो सपोर्ट मिळतोय त्याच्या फॅमिलीकडून किंवा त्याची बहिण प्रांजल वेळप्रसंगी आम्ही दोघेही नसू तर ती स्वतः येऊन थांबते इथे.

त्यामुळेच मी फिल्मचे, सिरीयलचे शूटिंग करू शकते आणि प्रोग्राम सुद्धा चालू आहेत. जसं माझं करिअर लग्नाच्या आधी जोरदार सुरू होतं, त्याहून अजून जास्त वेगाने सुरू आहे. याच सगळं क्रेडिट मी माझी फॅमिली, नवरा, लहान मुलगा सुद्धा म्हणजे त्याला लिटरली आता इतकी सवय झाली आहे की, तो म्हणतो मम्मी आज तु मुंबईला जाणार आहेस का? एवढा तो समजून घेतो.

मला एक प्रसंग सांगायला आवडेल की, एक दिवस मी शूट करत होते मुंबईला आणि मला खूप आठवण येत होती मुलाची. ही गोष्ट मी सौरभशी शेअर केली अन् त्याने सगळं बाजूला ठेवून मुलाला स्वतः घेऊन आला सेटवरती. त्यावेळी मला जो आनंद झाला, तो शब्दात न सांगता येण्यासारखा आहे.

खरतर अशा छोट्याछोट्या गोष्टी, प्रसंग आहेत, पण हे लक्षात राहतात. नातेसंबंध दृढ होण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाला स्वतःची स्पेस द्यायला हवी. छोटया गोष्टीत आनंद मिळवणं. म्हणजे त्या व्यक्तीसाठी काही सरप्राईज देणार असेल तर त्यांच्या ते नक्कीच लक्षात राहतं. प्रत्येक गोष्टी पैशात नाही मोजू शकत तर ते छोटे छोटे सरप्राईज दिले तर नक्की मला फायदा होईल.

सगळ्यात जवळची व्यक्ती निनादविषयी मला सांगायला आवडेल की, आम्ही लहानपणापासून आई-बाबांचं सहजीवन बघत मोठे झालोय. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, खरंतर ते खूप अवघड काम आहे. जबाबदारी मोठी आहे आणि लोकांच्या अपेक्षाही खूप असतात. अशात स्वतःच स्थान निर्माण करणं, खूप अवघड असतं. पण निनाद आणि मी आई-बाबांप्रमाणे संतूर आणि डान्स एका स्टेजवर सादर केलं, त्याप्रमाणे आम्ही एकत्र ही गोष्ट सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

नाती दृढ होण्यासाठी....

1) नाती दृढ होण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशीच हक्काने भांडतो तर कोणताही गैरसमज असेल तर तो बोलून प्रश्न सुटू शकतो.

2) कोणालाही गृहित धरू नका. कोणतीही व्यक्ती जवळची असली तरी प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. त्यांचा मान ठेवा.

3) समोरच्याला दुषणे देण्यापेक्षा स्वतः एखादे नाते टिकविण्यासाठी किती प्रयत्न करतोय याचे आत्मपरिक्षण करा.

4) नेहमीच एकमेकांच्या संपर्कात रहा. प्रत्येकवेळी भेट होणे शक्य नसेल तर एखादा फोन किंवा मेसेज केला तरी दखल घेतल्याची भावना निर्माण होते आणि दिवस छान जातो.

5) आपल्या जवळच्या व्यक्तीशी कधी भांडण झाले तर स्वतः पुढाकार घेऊन नमती बाजू घ्या व राग मनात न धरता मोकळेपणाने बोलून भांडण विसरून जा.