ओबीसी मंत्रालयाला स्वतंत्र मंत्री देणार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - "ओबीसी' मंत्रालय सध्या माझ्याकडे आहे; पण लवकरच या मंत्रालयासाठी स्वतंत्र मंत्री देण्यात येईल; तसेच ओबीसी महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशा महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केल्या. 

ओबीसी समाजाला स्वतंत्र मंत्रालय दिल्याबद्दल मुंबई भाजपने मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि धन्यवाद सभा आयोजित केली होती. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ""ओबीसी समाजाला सर्व संधी मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे मंत्रालय स्थापणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.'' 

""मागासवर्गीयांच्या योजनांचा निधी कुठे जातो, हे शोधण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सुमारे 800 ते 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याचा अंदाज आहे. ओबीसींच्या नावाखाली लोक पैसे खात होते. ओबीसी महामंडळ कमकुवत असून, त्याला सक्षम करण्यात येईल व आवश्‍यक निधीही देण्यात येईल,'' असेही ते म्हणाले.

Web Title: OBC will separate Ministry