खिल्ली उडविलेल्या 'त्या' पोलिसावर होणार शस्त्रक्रिया

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई : लेखिका शोभा डे यांनी पोलिसांवर विनोद करण्यासाठी एका लठ्ठ पोलिसाचा फोटो ट्विट केला.. आणि लठ्ठपणावरून मध्यप्रदेशचा तो पोलिस अधिकारी आणि त्यांचा लठ्ठपणा सोशल मीडियावर चर्चेत आला. ज्यांची खिल्ली उडवली, त्या दौलतराम जोगावत यांना वजन कमी करायचं असून, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी मदत करण्याचे आश्वासन दिले असून, ते मुंबईत उपचार घेणार आहेत. 

दौलतराम जोगावत असे या संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. महापालिका निवडणुकांच्या मतदानासाठी मुंबईत 'भारी' (हेवी) बंदोबस्त आहे असे लिहून त्यासोबत शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. मात्र, या फोटोतील अधिकारी मुंबई पोलिसांतील नसून, मध्यप्रदेशातील पोलिस निरीक्षक आहेत हे नंतर मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे तब्येतीवरून चेष्टा केल्याबद्दल शोभा डे यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली. 

मीडियाचे मानले आभार...
माध्यमांनी माझ्या या समस्येवर चर्चा केली. त्यावर काहीतरी उपाय होईल अशी आशा मला त्यामुळे निर्माण झाली आहे. माझं आयुष्य आणखी चांगलं होईल. मी माध्यमांचे आभार मानतो, असे जोगावत यांनी सांगितले. 

मुंबईत शस्त्रक्रिया

मुंबईतील सेंटर फॉर ओबेसिटी आणि डायजेस्टिव्ह सर्जरीचे तज्ज्ञ दौलतराम यांना भेटले आणि त्यांना सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तसचे, इंदूर येथील अरबिंदो हॉस्पिटलने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. लठ्ठपणासंबंधीचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. लकडावाला हे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगण्यात आले. 
दौलतराम यांचं वजन सध्या 180 किलो एवढे आहे. जगातील सर्वात वजनदार महिला इमाम हिच्यावरही डॉ. लकडावाला शस्त्रक्रिया करणार आहेत.

दौलतराम यांनी सांगितले की, माझी तब्येत 1993 पर्यंत व्यवस्थित होती, परंतु उपचारांदरम्यान घेतलेल्या इन्सुलिनमुळे वजन खूप वाढले. दरम्यान शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. 
 
Web Title: Obese police Who Shobha De Tweeted About, hopes for surgery in Mumbai