ठक-ठक! दरवाजा उघडा, आम्ही तुमच्या मुलांना बेड्या ठोकायला आलो आहोत...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

 रेल्वे रुळांजवळ पतंग उडवाल तर घरी ऍम्ब्युलन्स आणि पोलिस दोघेही येतील.. 

मुंबई - मकर संक्रांत जवळ येतेय. अशात अनेकांचं पतंग उडवायचा बेत हा असतोच. विविध प्रकारचे पतंग मार्केटमध्ये आलेत. पण मुंबईकरांनी आधी ही बातमी नीट वाचा.  नुसता 'काय-पो-चे' करत पतंग उडवू नका. कारण तुमची पतंग जर चुकूनही रेल्वेरूळ ओलांडून गेली तर घरी ऍम्ब्युलन्स आणि पोलिस दोघेही येतील. 

पश्‍चिम रेल्वे प्रशासन रेल्वे परिसरात पतंग उडवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. पतंगाच्या मांजामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे अशा पतंगबाजांना रोखण्यासाठी कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. 

जाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ? काय आहे 'लव्ह रूम..'

Image may contain: one or more people, train and outdoor

 

पश्‍चिम रेल्वेच्या परिसरात पतंग उडवताना दिसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक विभागात आरपीएफचे जवान तैनात असतील. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे परिसरात पतंगबाजी करू नये. 

- एस. आर. गांधी, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पश्‍चिम रेल्वे

धक्कादायक - लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा..

उपनगरी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून तब्बल 25 हजार व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह वाहत असतो. इतक्‍या प्रचंड क्षमतेच्या वीजवाहिन्यांच्या स्पर्शानेच नव्हे, तर केवळ संपर्कात आल्यानेही विजेचा मोठा धक्का लागण्याची शक्‍यता असते. ओव्हरहेड वायरपासून पाऊण मीटर अंतरावर आलेल्या पतंगातूनही वीजप्रवाह वाहून जबर धक्का बसू शकतो. काही वर्षांपूर्वी बोरिवली येथे सात वर्षांचा मुलगा पतंग उडवताना विजेचा धक्का बसून जखमी झाला होता. 

बापरे - तीर रपकन घुसला तिच्या मानेत, लागलेला तीर एक दिवस मानेतच..

विजेच्या तारांमध्ये अडकलेला मांजा व पतंग काढण्याच्या धडपडीतून अनेक वेळा दुर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपनगरी रेल्वेस्थानकांच्या आवारात पतंग उडवू नयेत, असे आवाहन पश्‍चिम रेल्वेने केले आहे. रेल्वेस्थानकालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये असे प्रकार सर्रास आढळतात. पश्‍चिम रेल्वेवर माहीम, वांद्रे, कांदिवली व बोरिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी चालते. 

on the occasion of makar sankranti ban on flying kites near western railway track 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the occasion of makar sankranti ban on flying kites near western railway track