ऑक्‍टोबर हिटने विक्रमगड तापले

ऑक्‍टोबर हिटने विक्रमगड तापले
ऑक्‍टोबर हिटने विक्रमगड तापले

विक्रमगड ः परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये धुवाधार पावसाचा सामना केलेल्या विक्रमगडमधील नागरिकांना आता ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका बसू लागला आहे. 

सायंकाळी वाऱ्यासह पाऊस; तर दुपारी रणरणत्या उन्हाचा सामना करताना नागरिकांचे हाल होत आहेत. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गजन्य आजारांची साथही पसरली असून ऊन-पावसाच्या खेळामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांनी डोके वर काढले आहे.

तालुक्‍याला जूनपासून सुरू झालेल्या जोरदार पावसासह परतीच्या पावसानेही चांगलेच झोडपून काढले. दोन दिवसांपासून सकाळी ११ ते ४ ऊन, प्रचंड उकाडा; तर सायंकाळी वाऱ्यासह पाऊस अशा विचित्र वातावरणाचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. ऑक्‍टोबरमध्ये उकाड्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

कमालसह किमान तापमानातही वाढ होत असल्याने वातावरणात अचानक बदल होत असून हे वातावरण अनेकांना असह्य झाल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

बाहेर पडणे जीवावर! 
नवरात्रोत्सवाच्या अखेरपासून ऑक्‍टोबर हीटला सुरुवात झाली असून, वाढत्या उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी अकरापासूनच उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात होत असून दुपारी रखरखत्या उन्हात बाहेर पडणे नागरिकांच्या जीवावर येत आहे. हवेतदेखील ही उष्णता जाणवत असल्याने घराबाहेर पडतानाच सूर्यकिरणांपासून बचावाची खबरदारी विक्रमगडमधील नागरिकांना घ्यावी लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com