
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या महिले विरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तिला अटक केली आहे. दरम्यान सदर महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. या महिलेला जामीन मिळावा म्हणून दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याचेही समोर आले आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सुनैना होले नावाच्या महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून २५ जुलैलाआक्षेपार्ह फोटो आणि मजकूर पोस्ट केला. मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो एडिट करून पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेशात दाखवण्यात आले तर आदित्य यांच्या फोटोत साप दूध पितानाचा फोटो इन्सर्ट करण्यात आला आहे. त्यानंतर २८ जुलैलाआणखी एक ट्विट करण्यात आले. त्यात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करण्यात आला होता. ट्विटमध्ये #SushantSinghRajput #CBICantBeDeniedForSSR हे हॅशटॅगचा वापर करण्यात आला. या दोन्ही ट्विटवर तीव्र आक्षेप घेत अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
Bailable offense registered, Bail Done
Spoken to concerned officials
Will ensure a fair investigation on the charges pressed! https://t.co/HCJysxxyay
— Devang Dave (@DevangVDave) August 6, 2020
मात्र या महिलेला जामीन मिळवण्यासाठी मदत करा, असं ताजिंदर पाल बग्गा यांनी ट्विट करत देवांग दवे यांना टँग केले. त्यानुसार देवांग दवे यांनी महिलेला जामीन मिळवून देण्यास मदत केली. तसेट्विटही देवांग दवेनं केलं आहे. या पूर्वीही महाविकास आघाडीच्या नेत्यांविषयी अशाच प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती.
हेही वाचाः निगेटीव्ह व्यक्तींचे अहवाल देण्यास BMC अधिकाऱ्यांची टाळाटाळ! हायरिस्क कुटूंबांना होतोय मनस्ताप
या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात यावी आणि सुनैना होले या महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत केली होती. सायबर पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत भा. दं. वी. कलम १५३ (अ), ५०५ (२), ५००, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आणि संबंधित महिलेला अटक केली. अटकेनंतर सदर महिलेला जामीनही मिळाला आहे.
Offensive post against CM Uddhav thackeray aaditya thackeray arrested sunaina holey woman get bail from bjp minister