शिवसेना आजही म्हणतेय, धनुष्यबाणासमोरील बटण दाबा, शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

मुंबई - २०१९ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठरलेलं अत्यंत महत्त्वाचं वर्ष. या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टी घडल्या, त्या महाराष्ट्राने कधीच अनुभवल्या नव्हत्या आणि पाहिल्याही नव्हत्या. याची सुरवात झाली ती महाराष्ट्रातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून. शिवसेनेने भाजप सोबत केलेला ब्रेकअप, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेला घरोबा. यादरम्यान महाराष्ट्र तीन दिवसांसाठी स्थापन झालेलं फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार.

मुंबई - २०१९ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठरलेलं अत्यंत महत्त्वाचं वर्ष. या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टी घडल्या, त्या महाराष्ट्राने कधीच अनुभवल्या नव्हत्या आणि पाहिल्याही नव्हत्या. याची सुरवात झाली ती महाराष्ट्रातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या निकालांपासून. शिवसेनेने भाजप सोबत केलेला ब्रेकअप, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेला घरोबा. यादरम्यान महाराष्ट्र तीन दिवसांसाठी स्थापन झालेलं फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार. पुढे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी, त्यानांतर मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, खातेवाटपावरील वाद-विवाद, सगळं महाराष्ट्राने पाहिलं आणि अनुभवलं देखील.

मोठी बातमी - भाजपाविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या राज्यभर तीव्र आंदोलन..

मग अशात एक प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे शिवसेना अजूनही महाराष्ट्रातील जनतेसमोर मतांचा जोगवा मागतेय तरी कशाला ?  शिसवेना म्हणतेय "समृद्ध, संपन्न, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारमुक्त, सुजलाम् सुफलाम्, सुशिक्षित, सुरक्षित, हिरवागार, भगवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा." 

अरे बापरे - मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू 

जाणून घ्या  - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

१९ ऑक्टोबर रोजी केलेलं हे ट्विट अजूनही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सर्वात आधी दिसावं म्हणून पिन करून ठेवलंय. (पिन करून ठेवणं म्हणजे आपल्या ट्विटर फॉलोवर्सना कोणतं ट्विट सर्वात आधी दिसावं अशी सेटिंग. प्रयेकजण आपापल्या ट्विटरवर एक असं ट्विट पिन करून ठेवू शकतो. ) बरं, १९ ऑक्टोबर म्हणजे मतदानाच्या दोन दिवस आधी केलेलं हे ट्विट. हे ट्विट शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आजही तसंच आहे. आता महाराष्ट्रातील महाभारत राज्यातच काय देशभरात, जगभरात पाहिलं गेलं. आता महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन सरकार कामाला देखील लागलंय. अशात शिवसेनेने हे मतांचा जोगवा मागणारं हे ट्विट अजूनही अनपिन(UnPin)  का केलं नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.    

official twitter handle of shivsena asking people to vote for shivsena

 

 

 

 

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: official twitter handle of shivsena asking people to vote for shivsena