महावितरणच्या ऍपद्वारे ऑफलाइन मीटर रीडिंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

वीज ग्राहकांना एसएमएसही मिळणार
मुंबई - राज्याच्या दुर्गम भागांमध्ये वीज मीटरचे ऑफलाइन रीडिंग घेण्याची व्यवस्था महावितरणने मोबाईल ऍपमध्ये केल्यामुळे ग्राहकांना रीडिंगबाबतचा लघुसंदेश (एसएमएस) मिळणार आहे.

वीज ग्राहकांना एसएमएसही मिळणार
मुंबई - राज्याच्या दुर्गम भागांमध्ये वीज मीटरचे ऑफलाइन रीडिंग घेण्याची व्यवस्था महावितरणने मोबाईल ऍपमध्ये केल्यामुळे ग्राहकांना रीडिंगबाबतचा लघुसंदेश (एसएमएस) मिळणार आहे.

कोकण आणि गडचिरोली यांसारख्या भागात इंटरनेट नेटवर्कअभावी मोबाईल रीडिंग घेता येत नव्हते; परंतु ऑफलाइन रीडिंगचा समावेश महावितरणच्या ऍप्लिकेशनमध्ये करण्यात आल्याने देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या माहितीचा एसएमएसही ग्राहकांना मिळणार आहे. इंटरनेट नेटवर्कअभावी दुर्गम भागांमध्ये मीटर रीडिंग घेणे अशक्‍य होत असल्याचे कोकण पट्ट्यातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील वीज कर्मचारी संघटनांनी महावितरणच्या निदर्शनास आणले होते. या समस्येवर तोडगा कसा काढावा, असा प्रश्‍न महावितरणला सतावत होता; पण कंपनीने ऍपमध्ये तांत्रिक सुधारणा केली आणि ऑफलाइन रीडिंग लोड व सेव्ह करून नंतर ते सर्व्हरला जोडण्याची सुविधा निर्माण केली. महावितरणने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऍपद्वारे मीटर रीडिंगची सेवा सुरू केली.

आतापर्यंत आठ लाख 70 हजार ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. ऍपद्वारे मीटर रीडिंगबाबतचे एसएमएस सुमारे 85 लाख ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत.

ऍपद्वारे 10 हजार जोडण्या
महावितरणकडे ऍपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांद्वारे गेल्या वर्षी सुमारे 10 हजार ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. काही ग्राहकांना अवघ्या 24 तासांत वीजजोडणी देण्यात आली.

Web Title: offline meter reading by mahavitran app