महत्वाची बातमी! रायगड जिल्ह्याच्या सागरी सीमा कडकडीत बंद

महत्वाची बातमी! रायगड जिल्ह्याच्या सागरी सीमा कडकडीत बंद

अलिबाग : रस्तेमार्गाने जिल्ह्यात होणारी वाहतुक पुर्णपणे थांबवल्यानंतर सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला देखील पुर्णविराम देण्यात आला आहे. मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाग्रस्त सापडल्याने सागरी मार्गाने काही नागरिकांनी रेवस, मांडवा बंदरात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारातून विषाणुचा फैलाव होण्याची जास्त भीती असल्याने रायगड जिल्ह्याच्या सागरी सीमा पुर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील नागरिकांचे पलायन रोखण्यासाठी मांडवा सागरी पोलिस ठाणे, दादर सागरी पोलिस ठाणे, दिघी सागरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी समुद्रात दिवसरात्र गस्त घालत आहेत. त्यांच्या मदतीला सागरी सुरक्षा रक्षक, नेव्ही, बंदर विभाग, मत्स्यव्यवसाय विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. मच्छिमार संस्थांचे सदस्य देखील या घुसखोरीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com