ओला कारचालकांना भीती लुटारुंची...

दीपक शेलार
बुधवार, 2 जानेवारी 2019

ठाणे : ‘ओला’ कारचालकांसाठी मुंब्रा, बायपास ते शिळफाटा रस्ता धोकादायक बनला आहे. सलग दोन दिवस प्रवाशांनी दोन ओला कारचालकांना लुटले आहे. ही धक्कादायक घटना घडल्याने चालक धास्तावले आहेत. याप्रकरणी मुंब्रा आणि शिळडायघर पोलिस ठाण्यात अज्ञात लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : ‘ओला’ कारचालकांसाठी मुंब्रा, बायपास ते शिळफाटा रस्ता धोकादायक बनला आहे. सलग दोन दिवस प्रवाशांनी दोन ओला कारचालकांना लुटले आहे. ही धक्कादायक घटना घडल्याने चालक धास्तावले आहेत. याप्रकरणी मुंब्रा आणि शिळडायघर पोलिस ठाण्यात अज्ञात लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील शिवडी येथे राहणारे नितीन घार्गे हे भाड्याने ओला कार चालवतात. 28 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मरीन ड्राईव्ह येथून रशीद या नावाने मुंब्रा येथे जाण्यासाठी कार बुक करण्यात आली होती. त्यानुसार,18 ते 20 वयोगटातील दोघे जण मुंब्र्याला जाण्यासाठी कारमध्ये बसले. या दोघांच्या गप्पांमधून एकाचे नाव अरशद आणि दुसऱ्याचे नाव रेहान असल्याची माहिती मिळत आहे. साडेआठ वाजता कार मुंब्रा बायपास रोडवर आल्यानंतर प्रवाशांनी कार थांबवली. एकूण 881 रुपये भाडे झाले होते. कारचालक नितीनने भाड्याची मागणी करताच मागील सीटवर बसलेल्या रेहानने चाकू बाहेर काढून पैसे काढ अन्यथा मारून टाकू, अशी धमकी देत नितीनच्या उजव्या हाताच्या तळाहातावर वार केला.

त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार अरशदने नितीनच्या खिशातील मोबाईल व पाकिट हिसकावून दोघांनीही धूम ठोकली. पाकिटात 4 हजार 700 रुपये आणि इतर कागदपत्रे होती. हात रक्तबंबाळ झाल्याने घाबरलेल्या नितीनने आधी घर गाठले. नंतर 30 डिसेंबर रोजी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर रेहान आणि अरशद या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लुटारुंनी एकूण 12 हजार 700 रुपयांची लूट केली.

दुसऱ्या दिवशी असाच एक प्रकार शिळफाटा ते महापे रस्त्यावर घडला. गोरेगाव येथे राहणारे विजयकुमार महातो (28) हे भाईंदर येथील अखिलेश चौधरी यांच्या ओला कारचालक आहेत. 29 डिसेंबर रोजी पहाटे त्यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी सोडल्यानंतर थोड्याच वेळात कंपनीने दिलेल्या कॉलनुसार मुंब्रा पोलिस ठाण्यानजीक तिघे प्रवाशी कल्याण,कचोरे येथे जाण्यासाठी कारमध्ये बसले.

सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास शिळफाटा येताच तिघा भामट्यांनी कार महापे रोडवरून घेण्यास सांगितले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर लघुशंका करण्याचा बहाणा करीत तिघांनी चाकूचा धाक दाखवून कारमधून ढकलून देत कारसह दोन मोबाईल, दोन हजारांची रोकड व महत्वाची कागदपत्रे असा 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल पळवला. याप्रकरणी,शिळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: OLA car drivers Fear about Theft