इंधनदरवाढीमुळे ओला,उबर टॅक्सीची भाडेवाढ

देशभरात इंधन दरवाढीनंतर आता ओला,उबर ऍप बेस्ड टॅक्सीने भाडे वाढवले आहे. 22 मार्च पासून तब्बल 16 दिवस म्हणजेच 6 एप्रिल पर्यंत दैनंदिन इंधनाची दरवाढ झाली आहे
ola Uber taxi fare hike due to fuel price hike mumbai
ola Uber taxi fare hike due to fuel price hike mumbaisakal

मुंबई : देशभरात इंधन दरवाढीनंतर आता ओला,उबर ऍप बेस्ड टॅक्सीने भाडे वाढवले आहे. 22 मार्च पासून तब्बल 16 दिवस म्हणजेच 6 एप्रिल पर्यंत दैनंदिन इंधनाची दरवाढ झाली आहे. तर सीएनजी, एलएनजीच्या दरात दोन वेळा दरवाढ झाल्यानंतर आता टॅक्सी चालकांकडून भाडेवाढ केली जात आत असून, उबरने दिल्ली, कोलकत्ता 12 टक्के तर मुंबई, हैद्राबाद 15 टक्के भाडेवाढीची घोषणा केली असून, दोन्ही कंपन्यांमध्ये सुमारे 16 टक्याने भाडेवाढ दिसून येत आहे.

भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ओलाने आपल्या भाड्याचे दर वाढवले आहेत. ओलाने हैदराबादमध्ये मिनी आणि प्राइम कॅब सेवेच्या भाड्यात वाढ केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओलाच्या चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. इंधनाच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने त्यांचे मार्जीन कमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर ओलाने भाडेवाढीचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत टॅक्सी-रिक्षाच्या भाडेवाढीची मागणी

त्याशिवाय मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने सुद्धा रिक्षा-टॅक्सीच्या भांड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. रिक्षाच्या भाडेवाढीत 2 रुपये तर टॅक्सीसाठी 5 रुपयांची वाढीची मागणी करण्यात आली आहे. यासबंधीत नुकतीच एक बैठक ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com