बांधकामावरून झालेल्या मारहाणीत वृद्धाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

वज्रेश्वरी  : भिवंडी तालुक्यातील भिवाळी या गावी घरा समोर अंगणात बांधकाम करण्यावरून झालेल्या तरुणांच्या मारहाणीत एका वृद्ध नागरिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी स तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे.

वज्रेश्वरी  : भिवंडी तालुक्यातील भिवाळी या गावी घरा समोर अंगणात बांधकाम करण्यावरून झालेल्या तरुणांच्या मारहाणीत एका वृद्ध नागरिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी स तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिवाळी या गावी जमिनीच्या वादातून एका वृद्ध नागरिकाची हत्या झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणाविषयी गणेशपुरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भिवाळी या गावातील कान्हा पाटील वय 60  यांचे राहते घर आहे, तेथे ते आपल्या जागेत अंगणात ओटा बांधकाम करीत होते त्या नुसार बांधकाम करीत असताना त्या बांधकाम करण्यास मज्जाव करण्यासाठी येथील पंढरी मधुकर पाटील,  मुकेश राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील,  मंजित पाटील हे चौघे हातात टिकाव, फावडे, घेऊन कान्हा पाटील यांच्या घरात घुसून तू बांधकाम करू नकोस असे सांगून ते  बांधकाम तोडू लागले.

त्या दरम्यान कान्हा पाटील व त्याचा मुलगा मंगेश यांनी विरोध केल्याने या चौघांनी मिळून जोरदार हल्ला केला, त्यात वयोवृद्ध कान्हा पाटील यांना मुकेश यानी धरून ठेऊन रवी पाटील, मंजित पाटील व पंढरी पाटील यानी त्यास नाकावर, छातीवर, डोक्यात व पोटात ठोश्या बुक्क्यांचा जोरदार मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना कळवा येथे रुग्णालयात दाखल करणयात आले होते. त्यांच्या पोटात  छात्तीत गंभीर दुखापत झाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे हे आरोपीच्या शोधात असून या प्रकरणी पुढील तपास करीत आहे
 

Web Title: Old man dies in construction brawl