टिळक नगर येथे वृद्धाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - टिळकनगर येथे राहत्या घरात वृद्ध व्यक्ती मृतावस्थेत सापडली असून, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत छोटेलाल मौर्या (वय 75) यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला अटक केली. 

छोटेलाल हे त्यांची पत्नी धानुदेवी (65) यांच्यासोबत पी. वाय. थोरात मार्ग परिसरात राहतात. त्यांना सहा मुले असून मौर्या दांपत्य भाजी विक्रीचे काम करत होते. रविवारी दुपारी 2 ला छोटेलाल घरी झोपले असताना धानुदेवी दुकानात गेली होती. घरी परतल्यावर छोटेलाल रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. शवविच्छेदन अहवालात छोटेलाल यांच्यावर टणक वस्तूने प्रहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिस सीसी टीव्हीच्या तपासणीत धानुदेवी यांच्याव्यतिरिक्त कोणीही घरात गेले नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार धानुदेवी यांच्याकडे चौकशी केली असता मौर्या यांचे त्याच परिसरातील दोन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यानीच ही हत्या केल्याचे सांगितले. पेव्हर ब्लॉकच्या साह्याने ही हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Web Title: Old man murdered in Tilak Nagar