पाणीपट्टी, वीजबिलांसाठी जुन्या नोटा स्वीकारणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाणीपट्टी व विद्युत देयकाची वसुली करण्यासाठी जुन्या 500 व 1000 रुपये मूल्याच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास जलसंपदा विभागाने अनुमती दिली असून, या नोटा 24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील, असे एका अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केले आहे. 

जलसंपदा विभाग व विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालये व सर्व सिंचन विकास महामंडळे यांना ता. 8 नोव्हेंबर पूर्वीच्या देयकापोटी येणे असलेल्या पाणीपट्टीच्या (सिंचन, बिगर सिंचन) देय/थकीत रकमा रोखीने जुन्या चलनात स्वीकारण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार वसूल करावयाची रक्कम ही ता. 8 नोव्हेंबर 2016 पर्यंत वा तत्पूर्वीच्या देयकाची असावी. 8 नोव्हेंबर 2016 नंतरच्या करापोटी आगाऊ रकमांचा भरणा स्वीकारला जाणार नाही. भरणा करण्यात येणारी रक्कम ही कोणत्याही परिस्थितीत ना-परतावा राहणार असून, तशी कल्पना संबंधितास देण्यात येईल. पाणीपट्टी व विद्युत देयकाची वसुली 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

Web Title: old notes accepted for water tax,electricity bill