टपाल कार्यालयात जुन्या नोटा घेणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

ठाणे -  टपाल कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या सोईसाठी जुन्या नोटा नियमाप्रमाणे बदलून देण्यासाठी विशेष काऊंटर सुरू करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या नोटा बदलून देण्यास नागरिकांना होत असलेल्या अडचणीवर तातडीने उपाय करण्याच्या सूचना दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मंत्रिमंडळाची एक उपसमिती यावर देखरेख करणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी टपाल विभागाला विशेष कक्ष सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. टपाल विभागाकडून बचत खाते, पुनरावृत्ती खाते, राष्ट्रीय बचत पत्रे, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, जनधन योजना, अटल पेन्शन योजना, मासिक आय योजना, टाईम डिपॉझिट, टपाल विमा योजना आदी योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. टपाल विभाग बचत खाते 50 रुपयांनी उघडून त्यामध्ये जुन्या नोटांचा भरणा करू शकतात. त्यानंतर आपल्या गरजेप्रमाणे या खात्यामधून (सध्याच्या नियमाप्रमाणे) रक्कम काढू शकतात. यासाठी आपले ओळखपत्र, पॅन कार्ड व आधार कार्ड याची स्वयंप्रमाणित प्रत आवश्‍यक आहे. टपाल खात्यांचे एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे भारतीय टपाल विभागाच्या एटीएममधून पैसे काढू शकता.

Web Title: old notes takes post office