‘मेट्रो’च्या कामासाठी जुन्या झाडांचे बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

दहिसर पूर्व परिसरातील आनंदनगर येथे शनिवारी (ता. ११) मेट्रोच्या कामासाठी २० ते २५ वर्षे जुने पिंपळाचे व इतर मोठे पाच ते सहा झाडे तोडण्यास सुरुवात झाली.

मालाड -  दहिसर पूर्व परिसरातील आनंदनगर येथे शनिवारी (ता. ११) मेट्रोच्या कामासाठी २० ते २५ वर्षे जुने पिंपळाचे व इतर मोठे पाच ते सहा झाडे तोडण्यास सुरुवात झाली. दहिसरमधील अननस नगर येथील त्रिमूर्ती व आविष्कार सोसायटीलगतच्या झाडांचा बळी ‘मेट्रो’मुळे जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वृक्ष वाचवण्यासाठी मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांनी दुर्लक्ष करून आता ही झाडे तोडली जात आहेत. एकीकडे राज्य सरकार आणि पालिका ‘हरित मुंबई’ आणि ‘झाडे लावा, जीवन वाचवा’चा संदेश देते; तर दुसरीकडे जुने मोठे वृक्ष तोडले जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old trees cut for the construction of Metro