मधुमेहाच्या उपचाराखाली ज्येष्ठ महिलेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई - रुहानी औषधोपचाराचे प्रलोभन दाखवून अनेक वर्षे मधुमेहाने त्रस्त असलेल्या ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणाऱ्या अली अहमद अब्दुल शकूर ऊर्फ मोहम्मद अली या संशयितास ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवार (ता. 24)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक 20 वर्षांपासून त्या मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह बरा व्हावा याकरता त्यांनी अनेक वैद्यकीय उपचार घेतले. उपचार घेऊनही मधुमेह बरा न होत असल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या. एका परिचिताने त्यांना मोहम्मद अलीच्या रुहानी औषधोपचाराबाबत माहिती दिली. त्याच्याशी संपर्क साधला.

अली डिसेंबर 2017 मध्ये मुंबईत आला असता त्याने तक्रारदार महिलेकडून औषधोपचाराच्या नावाखाली 40 हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्याने पुन्हा तिला फोन करून समुद्रकिनारी उपचारासाठी 31 हजार रुपये उकळून पळ काढला. तपासात अली उत्तर प्रदेशला असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Old Woman Cheating for Diabetes Treatment Crime