कल्याण डोंबिवलीतील शाळांचा निर्णयही १५ डिसेंबर नंतर

School
SchoolSakal media

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) कमी झाल्याने राज्य सरकारने (mva government) १ डिसेंबरपासून १ ली ते ४ थीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय (school starts) घेतला होता. मात्र जागतिक स्तरावर ओमिक्रॉनचा या कोरोनाच्या (omicron corona variant) नव्या विषाणूचा धोका पाहून मुंबई, ठाणेप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतील शाळाही (kalyan-Dombivali school) १५ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr vijay suryavanshi) यांनी आज जाहीर केला.

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभाग, आरोग्य विभागाची बैठक पार पडली. ओमिक्रॉन या विषाणूचा प्रसार वाढत आहे. परदेशातून डोंबिवलीत काही नागरिक आले असून, त्यांच्यातील एक व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरू न करता १५ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील परिस्थिती पाहून १५ डिसेंबरनंतर शाळा सुरू करायच्या की नाही, हा निर्णय घेण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान शाळा सुरू होणार असल्याने मुलांच्या स्वागतासाठी शाळांनी जय्यत तयारी केली होती. रांगोळी, फुलांनी अनेक शाळांचा परिसर सजवण्यात आला होता. मात्र शाळा सुरू न करण्याचा सूचना आल्याने मुख्याध्यापक, शिक्षक यांचा हिरमोड झाला. काही मुलांनी शाळा सुरू होणार म्हणून गणवेशापासून बॅग व इतर साहित्याची तयारी केली होती. मात्र त्यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com