Vidhan Sabha 2019 : अजित दादांशी एकदा चर्चा झाली; पण...- तटकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण, मी तोपर्यंत पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो, असे अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यावर सांगितले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण, मी तोपर्यंत पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो, असे अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यावर सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते तटकरे यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अवधून तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. तटकरे म्हणाले की, मी कोणावरही नाराज नाही. राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी शिवसेनेत आलेलो नाही. पक्षप्रवेशांबाबत काका सुनील तटकरे यांच्याशी काहीही बोलणे झाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तटकरे पिता-पुत्र मातोश्रीवर शिवसेनेत करणार प्रवेश

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खा. सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे आणि भाऊ अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पक्षप्रवेशाविषयी चर्चा केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: once discussion with Ajit pawar but already takes decision says Avdhoot Tatkare