लोकलमध्ये विसरली होती दीड लाख रुपयांची पिशवी.. काही तासांत अशी मिळाली परत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कर्करोग रुग्णांच्या औषधोपचाराची रक्कम रेल्वे पोलिसांकडून परत

मुंबई : उपनगरी गाडीत विसरलेली तब्बल दीड लाख रुपये असलेली पिशवी रेल्वे पोलिसांच्या वेगवान हालचालींमुळे मालकाला परत मिळाली. ही घटना चर्चगेट स्थानकातील असून रेल्वे पोलिसांच्या बजावलेल्या कर्तव्याचे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही रक्कम कर्करोग रुग्णांच्या औषधोपचारासाठी जमा करण्यात आली होती.

मुकेश अंबानींपाठोपाठ 'हे' आहेत भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती...

मालाडमधील सामाजिक कार्यकर्ते रामासरे शिवनाथ गुप्ता हे शुक्रवारी (ता.14) चर्चगेट लोकलने प्रवास करत होते. त्यांच्याजवळ कर्करोग पीडितांना औषधोपचारासाठी मदत म्हणून देण्यासाठी दीड लाख रुपये होते. प्रवासादरम्यान रामासरे त्यांच्याकडील रक्कम असलेली पिशवी लोकलमध्येच विसरले. प्रभादेवी रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर पिशवी लोकलमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली.

आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

पोलिसांनी नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर नियंत्रण कक्षाने चर्चगेट रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, रेल्वे पोलिस अरुण कुमार वर्मा व मुंबई सुरक्षा मंडळाचे जवान दत्तात्रेय नवघने यांनी चर्चगेटला आलेल्या लोकलचा तपास केला. तेव्हा त्यांना एक बेवारस पिशवी मिळाली होती. 

... भाजपची एकहाती सत्ता येईल! 

कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नका, अशा सूचना रेल्वेतून वारंवार दिल्या जातात. त्यामुळेच ही पिशवी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर काही कालावधीत सामाजिक कार्यकर्ते गुप्ता हे चर्चगेट रेल्वे पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी गुप्ता यांना दीड लाख रुपये व कागदपत्रे, चेकबुक व एटीएम कार्ड असलेली पिशवी परत केली.

One and a half lakh rupees bag was forgotten in local train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half lakh rupees bag was forgotten in local train