गेल्या वर्षीही तेच झालं होतं, यंदाही तेच ! स्वीटी खेळताना घराबाहेर गेली आणि आई वडिलांना मिळाला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गेल्या वर्षीही तेच झालं होतं, यंदाही तेच ! स्वीटी खेळताना घराबाहेर गेली आणि आई वडिलांना मिळाला मृतदेह

मुंबईतील नालासोपारा परिसरात मनाला चटका लावून जाणारी एक घटना घडलीये. नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग परिसरात एका मुलीचा गटारात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय.

गेल्या वर्षीही तेच झालं होतं, यंदाही तेच ! स्वीटी खेळताना घराबाहेर गेली आणि आई वडिलांना मिळाला मृतदेह

मुंबई : मुंबईतील नालासोपारा परिसरात मनाला चटका लावून जाणारी एक घटना घडलीये. नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग परिसरात एका मुलीचा गटारात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे या चिमुरडीचं वय हे केवळ दीड वर्ष एवढं होतं.

या प्रकारणांनंतर या चिमुरडीचे पालक आणि परिसरातील नागरिक चांगलेच संतापलेत. गेल्या वर्षीही याच धानीव बाग परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. तेंव्हाही उघड्या गटारात चार वर्षीय मुलगा पडून त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र महापालिकेने त्यानंतरही काहीही केलं नाही. म्हणूनच आज दीड वर्षाच्या मुलीचा उघड्या गटारात पडून मुत्यू झालाय असा आरोप तिचे कुटुंबीय करतायत. 

मोठी बातमी - गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न...

घटना काल रात्री म्हणजेच बुधवारी घडलीये. रात्रीच्या वेळेस दीड वर्षाची स्वीटी खेळत घराबाहेर आली. बराच वेळ झाला, स्वीटी दिसत का नाही म्हणून तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली. परिसरातील नागरिकांच्या साहाय्याने स्वीटीचा शोध सुरु झाला. मात्र काही तासांनी स्वीटीचा मृतदेह त्याच परिसरातील उघड्या गटारात सापडला. या घटनेननंतर या परिसरात शोकाकुल वातावरण आहे. 

या घटनेननंतर कुटुंबीयांनी महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. गेल्या वर्षीच्या घटनेननंतरही महापालिकेने काहीही पावलं उचलली नाहीत. म्हणून आज स्वीटीचा जीव गेला असं तिचे कुटुंबीय म्हणतायत. 

one and half year girl falls in manhole and lost life in nalasopara

loading image
go to top