उघड्या नाल्यात पडून दीड वर्षांचा चिमुकला बेपत्ता

divyanshu
divyanshu

मुंबई : गोरेगाव पूर्व आंबेडकर नगरमधील दीड वर्षीय दिव्यांशु सिंग हे लहान बाळ घराजवळील नाल्यात पडून वाहत गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अग्निशमन दलाने रात्रभर शोध घेऊन देखील हे बाळ अद्याप सापडलेलं नाही.

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या आई-वडील आणि दोन भावंडांसह राहणारा दिव्यांशु घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेच निळून न आल्याने रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये दिव्यांशु चाळीतून चालत चालत बाहेरील रस्त्यावर आला आणि रस्त्याजवळील उघड्या नाल्यात पडला असल्याचं स्पष्ट झालं.

पावसामुळे नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने दिव्यांशु पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बेपत्ता झाला. त्याच्या घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करत दिव्यांशुचा नाल्यात उतरून शोध घेतला पण दिव्यांशु सापडला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रात्रभर या नाल्यात दिव्यांशुचा शोध घेतला मात्र तो अद्याप सापाडलेला नसून त्याला शोधण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com