मनसेचा एकमेव आमदार लागला कामाला; वाचा काय केलंय प्रमोद पाटील यांनी

दीपक शेलार
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

एकीकडे सत्तेच्या खुर्चीसाठी इतर पक्षीयांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे राज्यात ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार प्रमोद ( राजू) पाटील हे मतदारराजाचा विश्वास सार्थ करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. प्रमोद ( राजू) पाटील यांनी ठामपा आयुक्तांची भेट घेतलीये.

एकीकडे सत्तेच्या खुर्चीसाठी इतर पक्षीयांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे राज्यात ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार प्रमोद ( राजू) पाटील हे मतदारराजाचा विश्वास सार्थ करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. प्रमोद ( राजू) पाटील यांनी ठामपा आयुक्तांची भेट घेतलीये.  

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आल्यानंतर प्रमोद पाटील यांनी आता मतदारसंघात प्रलंबित असलेल्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केलीये. आज (मंगळवार) ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची प्रमोद पाटील यांनी भेट घेतली. दरम्यान मतदार संघातील समस्या तडीस लावणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.

PMC बॅंकेतून पैसे काढण्याची 'ही' आहे नवी मर्यादा

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाला समकक्ष यंत्रणा उभारणार?

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघापैकी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर मनसेचा एकमेव आमदार निवडून आला आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघात कल्याण महापालिका, ठाणे  महापालिका आणि नवी मुंबई या महापालिकेचाहि काही भाग येतो. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या दिवा, दतीवली आणि शिळफाटा या भागात उद्भवत असलेल्या समस्यांबाबत आमदार पाटील यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा केली.

आता बास, 48 तासानंतर शिवसेना अॅक्टीव्हेट करणार आपला प्लान 'B'

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत पाटील यांना  विचारलं असता, विरोधी पक्षात राहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेला उत्तम यश कसे मिळेल. कल्याण, ठाणे, नवीन मुंबई या शहरी भागात पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांचे हात बळकट करण्यासाठी  सर्वतोपरी मेहनत घेणार असल्याचं देखील पाटील यांनी सांगितले.

WebTitle : one and only mla of MNS starts his work by meeting TMC commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one and only mla of MNS starts his work by meeting TMC commissioner