वांद्रे येथून दिवसाढवळ्या कासव चोरणा-याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई : वांद्रे येथील परिसरातून दिवसाढवळ्या कासव चोरणा-या इसमाला गुरुवारी कांदळवन वनविभागाने पकडले. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपीच्या शोधात वनअधिकारी होते. 

मुंबई : वांद्रे येथील परिसरातून दिवसाढवळ्या कासव चोरणा-या इसमाला गुरुवारी कांदळवन वनविभागाने पकडले. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपीच्या शोधात वनअधिकारी होते. 

जून महिन्यात वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्डच्या किना-यावरुन दोन इसम कासवाला जाळ्यात बांधून नेत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले. या प्रत्यक्षदर्शीने कासवाबाबतचा जाब विचारताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर या इसमाने कंट्रोल रुमला फोन केला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या इसमाने नजीकच्या वस्तीत शोधही घेतला. आरोपी राजू रामा आपल्या घरी कासवाला घेऊन गेला. त्यावेळी काहीजणांनी कासवावर बसून फोटोही काढले. स्थानिक पोलिसांनी त्याच्याकडून कासवाची सुटका केली. परंतु आरोपीला सज्जड दम देऊन सुटका केली. 

दरम्यान कासव फरफटून दोन इसम घेऊन जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमी चांगलेच संतापले. त्यानंतर कांदळवन वनविभागानेही या दोघांचा शोध घेतला. परंतु बॅण्ड स्टॅण्ड नजीकच्या वस्तीची विस्तीर्णता पाहता दोन्ही इसमांना शोधण्यात कांदळवन विभागाला अडथळे येत असल्याची माहिती कांदळवन मुंबई पश्चिम विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल आणि ठाणे खाडीचे वनक्षेत्रपाल मयुर बोठे यांनी दिली. राजू दोन महिन्यांपासून वस्तीबाहेर पडला नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे अजूनच कठीण होऊन बसले. राजू आज गुरुवारी कामासाठी वस्तीबाहेर पडला आणि वनअधिका-यांच्या तावडीत सापडला. दुस-या आरोपीच्याही आम्ही शोधात आहोत, अशी माहिती बोठे यांनी दिली. 

हॉक बिल नावाचे कासव भारतीय वन्यजीवल संवर्धन कायद्यात संवर्धित वर्गवारीत क्रमांक एक वर आहे. त्यानुसार, आरोपी राजूला सात वर्षांची शिक्षाही होऊ शकते. आरोपी राजूला उद्या वांद्रे कोर्टात हजर केले जाणार आहे.

Web Title: one arrested in bandra for theft of Turtle