येऊरच्या जंगलात हातभट्टी दारूसह एकजण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरात गावठी दारू संबंधित टोळी सक्रिय असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

ठाणे ः पर्यटनस्थळ असलेल्या येऊरच्या जंगलात हातभट्टीच्या गावठी दारूची निर्मिती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या गुत्त्याचा पर्दाफाश केला. तसेच, वसईतील एकाला रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून 20 लिटर गावठी दारू हस्तगत केली आहे. 

याप्रकरणी अनंत माळी (41 रा. खोलांडे ता. वसई) याला वनाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून त्याच्याकडून 20 लिटर गावठी दारू हस्तगत केली. त्याच्यावर वन कायद्याखाली दारूभट्टी लावून वन्यजीवांच्या अधिवासास धोका पोहचविणे, जंगलामध्ये आग पेटवणे, तसेच रासायनिक पदार्थांचा वापर करून अवैधरित्या गावठी दारू उत्पादित केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरात गावठी दारू संबंधित टोळी सक्रिय असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी (ता.9) सकाळी साडेआठ वाजता वनाधिकाऱ्यांनी सापळा रचला. येऊर वनक्षेत्र परिमंडळ नागला बंदर परिसरातील ससून घर येथील राखीव वन क्षेत्रातील ईदळीचा नाला येथे हातभट्टीची दारू गाळण्याचा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested with drunk liquor in the forest