बनावट पासपोर्टप्रकरणी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई - बनावट पासपोर्टद्वारे अमेरिकेत नोकरीला जाणाऱ्या कमलेशकुमार पटेल याला सहार पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दलालाच्या मदतीने पटेल अमेरिकेत जाणार होता. बनावट पासपोर्ट आणि परदेशात नोकरीकरिता तो एकाला ४० लाख रुपये देणार होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. 

कमलेश दहावी उत्तीर्ण आहे. सायकल व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने परदेशात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिका किंवा कॅनडाला नोकरी मिळावी, याकरिता त्याने गुजरातमधील दलालाची मदत घेतली. दलालाने नोकरीकरिता ४० लाखांची मागणी केली. परदेशात पोचल्यावर ही रक्कम देतो, असे पटेलने त्याला सांगितले. पटेल २७ मार्चला जोगेश्‍वरी येथे आला. २९ मार्चला त्याला पारपत्र देण्यात आले. ३१ मार्चला तो सहार विमानतळावर गेला. दलालाने त्याला विमानतळावरील शौचालय परिसरात नेले आणि अनोळखी व्यक्तीच्या नावाचा बोर्डिंग पास दिला. तो घेऊन पटेल विमानतळात शिरला. विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने पटेलच्या बोर्डिंग पासची पाहणी केली. त्या वेळी बोर्डिंग पास आणि पासपोर्ट बनावट असल्याचे लक्षात आले.

Web Title: One arrested in fake passport case