अश्‍विनी भिडे यांना त्रास देणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - सेव्ह आरे मोहिमेदरम्यान मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या एमडी अश्‍विनी भिडे यांना त्रास देण्याप्रकरणी एकाला गुरुवारी (ता.10) बीकेसी पोलिसांनी अटक केली. अविजित मायकल असे त्याचे नाव आहे. तांत्रिक माहितीवरून त्याला पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. 

महत्त्वाकांक्षी असलेल्या मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध आहे. मेट्रोच्या कारशेडची उभारणी गोरेगावच्या आरे कॉलनीत केली जाणार आहे. कारशेडमुळे आरेतील नैसर्गिक विविधता नष्ट होईल. मेट्रो कारशेडमुळे तीन हजार झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात सोशल मीडियावर सेव्ह आरे मोहीम हाती घेण्यात आली होती. सरकारपर्यंत आवाज पोहचावा याकरता नंबर दिला होता. तो नंबर मुंबई मेट्रोच्या एमडी अश्‍विनी भिडे यांचा होता. त्या नंबरवर फोन केल्यावर फोन करणाऱ्यांना धन्यवाद म्हणून मेसेज यायचा. तो नंबर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोनचा नाहक त्रास झाल्याने भिडे यांच्या वतीने जानेवारी महिन्यात बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासादरम्यान तो नंबर झटका.ओरगी या संकेतस्थळावरून अपलोड झाल्याचे उघड झाले. आतापर्यंत अडीच ते तीन लाख लोकांना तो मेसेज पाठवण्यात आला होता. गुरुवारी पोलिसांनी अविजितला अटक केली. अविजित हा बंगळूरूचा रहिवासी असून तो आयटी इंजिनिअर आहे. 

Web Title: one arrested in mumbai