इटालियन महिलेवरील बलात्कारप्रकरणी एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई - इटालियन पर्यटक महिलेवर टॅक्‍सीत बलात्कार केल्याप्रकरणी राकेश नंदी नीळकंठ याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तो कफ परेडचा रहिवासी आहे. 

मुंबई - इटालियन पर्यटक महिलेवर टॅक्‍सीत बलात्कार केल्याप्रकरणी राकेश नंदी नीळकंठ याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तो कफ परेडचा रहिवासी आहे. 

मुंबईत 14 जून रोजी जुहू भागात गाईडने आपल्यावर टॅक्‍सीत बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने केली होती. याच दिवशी तिची आरोपीशी ओळख झाली होती. आपण गाईड असल्याचा दावा त्याने केला होता. जुहू येथे पोहोचल्यावर त्याने एक टॅक्‍सी आरक्षित करून एका ठिकाणी दारू विकत घेण्यासाठी गाडी थांबवली. या महिलेसही त्याने मद्यपान करण्याची जबरदस्ती केली; मात्र तिने नकार दिला. या वेळी त्याने टॅक्‍सीतच या महिलेवर बलात्कार करून मोबाईलवर फोटो घेतल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी त्याने तिला गाठून पत्ता मागितल्यावर तिने पुन्हा बेंगळूरु गाठले. तिथल्या आश्रमात राहिल्यावर 26 जून रोजी तिने नवी दिल्लीतील इटालियन दूतावासाशी संपर्क साधला. इटालियन दूतावासाने दिलेल्या सल्ल्यानुसार पीडित महिलेने मुंबईत येऊन कुलाबा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही घटना जुहू ते कुलाबा प्रवासादरम्यान घडली असल्याने कुलाबा पोलिसांनी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला. आरोपी हा कफ परेड येथील आंबेडकर नगरचा रहिवासी आहे. त्याचा ताबा जुहू पोलिसांकडे देण्यात येणार आहे. 

Web Title: One arrested in rape case of Italian woman