घरफोडीप्रकरणी एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

सांताक्रुझमध्ये घरफोडी करणाऱ्याला वाकोला पोलिसांनी शनिवारी अटक केली. राकेश सुग्रीव खरटमोल असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. राकेश याच्याविरोधात चोरी, घरफोडींचे 70 गुन्हे दाखल आहेत. 
 

मुंबई -  सांताक्रुझमध्ये घरफोडी करणाऱ्याला वाकोला पोलिसांनी शनिवारी अटक केली. राकेश सुग्रीव खरटमोल असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. राकेश याच्याविरोधात चोरी, घरफोडींचे 70 गुन्हे दाखल आहेत. 

तक्रारदार हे सांताक्रुझच्या हमीद पठाण चाळीत राहतात. 12 दिवसांपूर्वी मेहुण्याच्या लग्नासाठी ते पुण्याला गेले होते. पहाटे तक्रारदाराची पत्नी घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्या वेळी त्यांना कपाटातून 1 लाख 49 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांच्या पतीने वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या वेळी राकेश संशयास्पद फिरत असल्याचे सीसी टीव्हीत दिसले. पोलिसांनी शुक्रवारी राकेशला साकीनाका परिसरातून ताब्यात घेतले असून, त्याचा एक साथीदार फरारी आहे. 

Web Title: One arrested in santa cruz