लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

कबाब आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तेथील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. 12) मानखुर्द परिसरात घडला. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करून बलात्कार व "पॉक्‍सो' कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - कबाब आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तेथील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. 12) मानखुर्द परिसरात घडला. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करून बलात्कार व "पॉक्‍सो' कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीला आजीने कबाब आणि पाव आणण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये पाठवले. खाद्यपदार्थ घेण्यासाठी हॉटेलात थांबलेल्या या अल्पवयीन मुलीवर इलियास मोहम्मद रफीक हाशमी (वय 22) या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी परत येऊन ही घटना आजीला सांगितली. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी हाशमीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: One arrested for sexual assault Crime