जुहूत चोरीप्रकरणी एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सव्वालाखाची चोरी केल्याप्रकरणी एकाला जुहू पोलिसांनी अटक केली. विमलेशकुमार राजदेव चौधरी असे त्याचे नाव आहे. विमलेश हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो रिक्षाचालक आहे. काही महिन्यांपासून तो तक्रारदाराच्या घरी राहत होता. विमलेश सकाळी, तर तक्रारदार हे रात्री रिक्षा चालवायचे.

मुंबई : सव्वालाखाची चोरी केल्याप्रकरणी एकाला जुहू पोलिसांनी अटक केली. विमलेशकुमार राजदेव चौधरी असे त्याचे नाव आहे. विमलेश हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो रिक्षाचालक आहे. काही महिन्यांपासून तो तक्रारदाराच्या घरी राहत होता. विमलेश सकाळी, तर तक्रारदार हे रात्री रिक्षा चालवायचे.

मार्चमध्ये विमलेशने दिवसा रिक्षा नेली होती. काही कारण सांगून तो घरी गेला. घरी त्याने तक्रारदाराचे सव्वालाख रुपये घेऊन पोबारा केला. रात्री तक्रारदार घरी आले तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्यांनी विमलेशला फोन केला. तेव्हा त्याचा फोन बंद होता. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विमलेश हा बिहारला असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाल्यावर तेथून अटक करण्यात आली आहे. 
 

Web Title: One arrested for the theft in Juhu