पेणमध्ये महिलेच्या हत्येप्रकरणी एक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पेण - रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला अटक केली आहे. पेणमध्ये 14 एप्रिलला एका महिलेचा दादर खाडीकिनारी मृतदेह आढळला होता. या प्रकरणी गणेश म्हात्रे (वय 51) याला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दादर गावातील खाडीकिनारी एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची गळा दाबून हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मृत महिला ही माणगावमध्ये राहणारी असून, ती रोहा एसटी स्थानकातून बेपत्ता झाली होती. तपासादरम्यान अलिबागमध्ये राहणाऱ्या गणेश म्हात्रे याला अटक केली. त्याला लष्करातून निलंबित केले असून, यापूर्वी त्याच्यावर तीन महिलांच्या हत्येचे गुन्हेही दाखल आहेत.
Web Title: one arrested in women murder case