ठाणे पालिका शाळांमध्ये सगळ्या विषयांसाठी एकच पुस्तक

file photo
file photo

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले नसले तरी त्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  त्यासाठी एकच पुस्तक छापण्यात येणार आहे. मात्र, विशेष पुस्तकासाठी तब्बल तीन कोटी तीन लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी करण्याच्या निमित्ताने पालिकेच्या निधीवरचा बोजा मात्र वाढणार आहे.

शाळा सुरू होऊन दोन महिने झालेले आहेत. अशावेळी पहिल्या सत्रात हे पुस्तक देणे शक्‍य नसल्याने हे पुस्तक आता दुसऱ्या सत्रातच उपलब्ध होऊ शकणार आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या शाळांमध्ये दुसऱ्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होऊ शकते. मात्र या निर्णयाला सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्‍यक असल्याने पुढील सर्वसाधारण सभेत याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून सादर करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून मुलांना वेळापत्रकानुसार पुस्तके आणावी लागतात. सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार केल्याने अभ्यासदेखील करणे सोपे होईल. महापालिकांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

प्रत्येक पुस्तकामागे तब्बल ७१ रुपयांचा खर्च 
पुस्तकांचे विषयानुसार स्वतंत्र वर्गीकरण केल्यानंतर कपडापट्टीसह बायण्डिंग तसेच कव्हरचे प्रिंटिंग आणि वाहतूक या खर्चापोटी दोन शैक्षणिक वर्षाकरिता तीन कोटी तीन लाख ७७ हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक पुस्तकामागे तब्बल ७१ रुपये खर्च महापालिकेला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com