उल्हासनगरात रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणाचा खून; लघुशंकेची विचारणा जिवावर बेतली

दिनेश गोगी
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

राग मनात येऊन त्याच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन ते निघुन गेले. काही मिनिटा नंतर तिघांनी चंदु याला एससीएस शाळे समोर गाठले व त्याच्या पोटात धारधार चाकु खुपसून तेथुन पळ काढला. रक्तरंजीत झालेल्या चंदूला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 

उल्हासनगर - सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या तरुणांना केलेली विचारणा एका तरुणाच्या जिवावर बितली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी एका भावाला जीव गमावण्याची ही दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली असून पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

जीव गमावलेल्या तरुणाचे नाव चंद्रकांत (चंदू) मोरे असून तो कपड्याच्या दुकानात सेल्समेन म्हणुन काम करत होता. रक्षाबंधानाची सुट्टी असल्यामुळे चंदु याने मी खेमानी येथे चायनीज खाऊन येतो असे चुलत भाऊ मुकेश याला सांगितले आणि रात्री साडेआठच्या सुमारास विकी व कर्तारसिंग या दोन मित्रांसोबत खेमानीला गेला. तिथे सार्वजनिक ठिकाणी तिघेजण लघुशंका करत असता. चंदु, विकी आणि कर्तारसिंग यांनी लघुशंका करत असलेल्या तरुणांना सार्वजनिक ठिकाणी लघुशंके बाबत हटकले. या गोष्टींचा राग मनात येऊन त्याच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन ते निघुन गेले. काही मिनिटा नंतर तिघांनी चंदु याला एससीएस शाळे समोर गाठले व त्याच्या पोटात धारधार चाकु खुपसून तेथुन पळ काढला. रक्तरंजीत झालेल्या चंदूला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र प्रकृती अतिगंभीर असल्याने त्याला कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे मध्यरात्री चंदूचा मृत्यू झाला.याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांनी रवी जैस्वार याला सायंकाळी अटक केली आहे.
 

Web Title: one boy murdered at rakshabandhan day at ulhasnagar