चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अंधेरी : चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिरोज हमीद खान (54) याचा कूपर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अमजद याला अटक केली. न्यायालयाने त्याला 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

मद्याच्या नशेत फिरोजचे अमजद या मित्राशी भांडण झाले. त्या वेळी अमजदने फिरोजच्या पाठीवर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या फिरोजला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस दाखल झाले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फिरोजवर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचे पोलिसांना सांगितले. उपचार सुरू असतानाच फिरोज याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी फिरोजचा भाऊ युसूफ हमीद खान (50) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमजद याला अटक केली. मित्र असलेले अमजद आणि फिरोज या दोघांवरही गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

web title : One dies in Knife attack

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies in Knife attack

टॅग्स