कल्याण: आगीवर नियंत्रण मिळविताना कर्मचाऱ्याचा मृत्यू

रविंद्र खरात 
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री आग लागल्याचे समजताच ती आग विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे दोन अग्निशामन दलाच्या घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा खंडित करून आग नियंत्रणात आणण्याच्या कामाला सुरुवात केली.

कल्याण : 1 नोव्हेंबरला कल्याण पूर्वमध्ये एका विहीर दुर्घटनामध्ये कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाचे दोन जवान हुतात्मा झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी मध्यरात्री कल्याण पश्चिममधील चायनीज दुकानाला आग लागली असताना ती नियंत्रणात आणताना अचानक झालेल्या स्फोटात एका जवानाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला. या घटनेने अग्निशामन दलात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या परिसरामध्ये भितीचे वातावरण आहे.

कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री आग लागल्याचे समजताच ती आग विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे दोन अग्निशामन दलाच्या घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा खंडित करून आग नियंत्रणात आणण्याच्या कामाला सुरुवात केली. अचानक झालेल्या स्फोटात अग्निशामन दलाचे लिडिंग फायरमन जगन्नाथ आमले यांचा मृत्यू झाला असून फायरमन संदीप पालवे हे जखमी झाले आहेत.

आगीत मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. जेथे आग लागली त्या बाजूला बॅटरी शॉप, बिअर शॉप होते. नेमका स्फोट कसा झाला याचा पोलिस तपास करत असून मृतक लिडिंग फायरमन जगन्नाथ आमले यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन  शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. असून फायरमन संदीप पालवे हे जखमी यांच्या उपचार सुरू आहे. स्फोटाचा आवाजामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे 1 नोव्हेंबर रोजी कल्याण पूर्वमधील विहीर दुर्घटनेमध्ये पालिका अग्निशामन दलाचे दोन जवान हुतात्मा झाले ही घटना ताजी असताना पुन्हा आग विझविताना एका जवानाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटनेने अग्निश्यामन दलातही एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: one firebrigade jawan died in fire at Kalyan