शंभर जागांचे स्वप्न शिवसेनेला खुणावतेय! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास 100 जागा शिवसेनेला मिळतील, असे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे 100 जागांचे स्वप्न शिवसेनेला खुणावत आहे. भाजपशी युती करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गंभीर नाहीत, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते; मात्र मुंबईत युती झाली नाही, तरी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते. 

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाच्या बैठका झाल्या असल्या, तरी दोन्ही पक्षांतील संवाद सध्या थांबलेलाच आहे. गुरुवारी (ता. 26) मेळाव्यात उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी स्वबळावर लढल्यास नेमक्‍या किती जागा जिंकता येतील, याची चाचपणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. यात सुमारे 100 जागा मिळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील काही सदस्यांना बोलावले होते. या वेळी शिवसेनेच्या या सर्वेक्षणाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते. 100 जागा निवडून येण्याची शिवसेनेला खात्री वाटत असल्याने ते गंभीर नाहीत, असेही भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते.

सरकारला धोका नाही 

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले, तरी सरकारच्या स्थैर्यावर कोणताच परिणाम होणार नाही, असा दावा भाजपतर्फे केला जात आहे. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढताना दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले, तरी सरकारला कोणताच धोका नाही, असेही सूत्रांनी सांगितले. 

Web Title: One hundred seats to Shiv Sena dream