भांडण सोडवणे जीवावर बेतले 

भांडण सोडवणे जीवावर बेतले 

मुंबई : दोन मित्रांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या मित्राचा हाणामारीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 4) वांद्रे परिसरात घडली. पार्थ मणिकांत रावल (25) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी धवल प्रफुल उनाडकट याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 9) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

वांद्रे परिसरात राहणारा मोहम्मद आसिफ अजीनडका रंगला याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. मोहम्मदची धवलसोबत सहा महिन्यांपूर्वी "इन्स्टाग्राम'वरून ओळख झाली होती. त्यानंतर चांगले मित्र झालेले हे दोघे अधून-मधून एकमेकांना भेटत असत. पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर धवल सतत दूरध्वनी करत होता; मात्र मोहम्मद उत्तर देत नव्हता. त्यामुळे संतापलेला धवल रविवारी सकाळी मोहम्मदच्या घरी गेला; तेव्हा पार्थ तेथे होता. 

पार्थवरून मोहम्मद आणि धवल यांच्यात वाद झाला. त्यानंतर धवलने रागाच्या भरात लॅपटॉपच्या केबलने मोहम्मदचा गळा आवळण्याचा आणि त्यानंतर चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मोलकरणीने मोहम्मदच्या दाराची बेल वाजवल्यामुळे धवल घाबरला. त्याच्या सूचनेवरून मोहम्मदने मोलकरणीला सायंकाळी कामाला येण्यास सांगितले. त्यानंतर मोहम्मद आणि धवल यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्या वेळी मध्यस्थीसाठी गेलेल्या पार्थच्या डोक्‍यावर धवलने लाकडी मेणबत्ती स्टॅंड मारला. 

जखमी झालेल्या पार्थला धवल आणि मोहम्मद यांनी वांद्य्रातील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार करून पुन्हा मोहम्मदच्या घरी आल्यावर पार्थ झोपला. मोहम्मदने सायंकाळी पार्थला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचे शरीर थंड पडले होते. त्यानंतर खासगी रुग्णालयात नेले असता पार्थचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. हा प्रकार समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश अनावकर आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी गेले. मोहम्मदने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि धवलला अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com