50 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी कॉक्स अँड किंग्सविरोधात आणखी एक गुन्हा

50 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी कॉक्स अँड किंग्सविरोधात आणखी एक गुन्हा

मुंबई, ता. 27 : आणखी एका बँकेची 50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्स अँड किंग्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला हा पाचवा गुन्हा आहे.  

गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला असून याप्रकरणी सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या ( ED ) ताब्यातील आरोपींची ईडी कोठडी संपल्यानंतर चौकशी करण्यात येईल, असेही सांगितले. एचडीएफसी बँकेच्या तक्रारीवरून कॉक्स अँड किंग्सचे प्रमोटर आणि इतर व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग फसवणूक कक्ष - 2 याप्रकरणी तपास करत आहे.

HDFC च्या तक्रारीनंतर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात भा दं वि कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. बनावट कागदपपत्रांच्या सहाय्याने एचडीएफसी बँकेकडून ते बुडवण्यात आल्याचा आरोपी तक्रारीत करण्यता आला आहे. त्यामुळे बँकेला 50 कोटी 71 लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. कॉक्स अँड किंगचे प्रमोटर पीटर केरकर विरोधात यापूर्वीच ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक व खासगी गुंतवणूकदार कंपनी यांनी तक्रार केली आहे. त्या चार तक्रारीनुसार 1900 कोटी रुपयांचे बँकांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

केरकर यांच्याही तक्रारीवरून याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचीही तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

( संपादन - सुमित बागुल )

one more complain registered against promoter of cox and king peter kerkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com