डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहाच्या नासधुस प्रकरणी एकाला अटक...

rajgruh
rajgruh

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेल्या राजगृह येथे नासधूस केल्याप्रकरणी एकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भा.दं.वि. कलम 447 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमेश जाधव (वय 35) असे आरोपीचे नाव आहे.याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त विरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. आरोपी परळ परिसरात रस्त्यावर राहणारा असून याप्रकरणी आणखी एका संशयिता बाबत पोलिस तपास करत आहेत. 

दादर येथील एक संशयित व्यक्ती मंगळवारी (ता.7) सायंकाळी पाचच्या सुमारास राजगृहात शिरला आणि त्याने फुलझाडांच्या कुंड्यांची नासधूस केली होती. त्यानंतर त्याने दगडाच्या साह्याने इमारतीच्या काचा फोडल्या. यामध्ये आठ ते दहा कुंड्यांचे नुकसान झाले होते. त्याशिवाय आरोपीने तेथील सीसीटीव्हीही फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी राजगृह येथील सीसी टीव्हीत दिसलेल्या संशयिताचा साथीदार आहे.

त्यामुळे राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राजगृह परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिसरातील रस्ते वाहतूक सुरू असली तरी वाहनांचीही तपासणी केली जात आहे. 

दरम्यान, पोलिसांनी राजगृह परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले असता यातील संशयिताची ओळख पटली होती. तीन फुट दरवाज्यातून आरोपींनी प्रवेश केला असून त्यांनी बागेत नासधूस केली, तसेच खिडकीची काच फोडली आहे. दरम्यान, आरोपींनी केलेल्या नासधुसीमध्ये सीसी टीव्हीचे नुकसान झाले नसल्याचे पोलिसांनी झाले.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com