सासवडजवळ 2 पिस्तुल व चार काडतुसांसह एकजण ताब्यात

सासवडजवळ 2 पिस्तुल व चार काडतुसांसह एकजण ताब्यात

सासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याच मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, दिलीप जाधवर, मोरेश्वर इनामदार, जगदिश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, राजेंद्र पुणेकर, गणेश महाडीक, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले आदींच्या पथकास सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिवरीला हॉटेल रुद्रानजीक एक इसम गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरुन या पथकाने तिथे सापळा रचून संशयित ज्ञानेश्वर संपत मोमीन (वय २०, रा. धायरीफाटा, ता. हवेली जि. पुणे) यास पकडले. त्याच्याकडून एक लाख 400 रुपये किंमतीचे बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले दोन गावठी मॅगझिनचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे आढळली. सदर संशयित आरोपीस पुढील कारवाईसाठी सासवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. तसेच त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ताब्यातील संशयित आरोपी मोमीन याने सदर पिस्टल कोणाकडून आणले. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, या अगोदर कोठे-कोठे पिस्टलची विक्री केली. आदींबाबत अधिक तपास सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच नोंदीतील गुन्हेगार, तसेच फरारी आरोपी पकडण्याकामी विशेष मोहिम राबविण्यासाठी पथकं नेमण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. याच पथकाकडून ही कारवाई झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com