घाणेडेमध्ये ओहोळात एक जण वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

शोधमोहीमेनंतर दुसऱया दिवशी फरशी येथून जवळ असलेल्या ओहोळात मृतदेह सापडला

मुंबई : विक्रमगड तालुक्‍यातील चरी बुद्रुक (डावरे पाडा) येथील पांडू डावरे (35) हा गृहस्थ बुधवारी संध्याकाळी कामावरून घरी येत असताना घाणेडे फरशी (डावरे पाडा) येथील ओहोळामधून पाण्याच्या पुरात वाहून गेला.

रात्री अंधार आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे शोधमोहिमेत अडथळे आल्याने रात्री पांडूचा शोध घेता आला नाही. आज गुरुवारी (ता. 1) सकाळी विक्रमगड तहसीलदार, महसूल कर्मचारी, गावकरी, स्थानिक नागरिक यांनी शोधमोहीम हाती घेतली. त्यामध्ये सकाळी 10 वाजता फरशी येथून जवळ असलेल्या ओहोळात पांडू याचा मृतदेह सापडला आहे.

मृतदेह विच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मनोर पोलिस ठाण्यामधे या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती विक्रमगडचे तहसीलदार श्रीधर गालीपिल्ली यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person drawn away