प्रश्‍नपत्रिकेतून प्रश्‍नच गायब!

प्रश्‍नपत्रिकेतून प्रश्‍नच गायब!
प्रश्‍नपत्रिकेतून प्रश्‍नच गायब!

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या सिव्हिल इंजिनियरिंगच्या तिसऱ्या सत्रातील सर्व्हेयिंग-१ या विषयाच्या पेपरमधील एक पर्यायी प्रश्‍नच दिला नसल्याचा प्रकार घडला आहे. परीक्षा विभागाने या प्रश्‍नपत्रिकेत २० गुणांचा पर्यायी प्रश्‍नच छापला नसल्याने परीक्षार्थींना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई विद्यापीठाकडून सध्या सिव्हिल इंजिनियरिंगची तिसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येत आहे. सिव्हिल इंजिनियरींगच्या सर्व्हेयिंग-१ या विषयाचा पेपर १८ नोव्हेंबर रोजी झाला. विद्यापीठाच्या नियमानुसार या पेपरमध्ये सहा प्रश्‍न असणे आवश्‍यक आहे. त्यातील पहिला प्रश्‍न सोडवणे बंधनकारक असून अन्य पाच प्रश्‍नांपैकी तीन प्रश्‍न विद्यार्थ्यांना सोडवता येऊ शकतात. त्यामुळे दोन ते सहा या पाच प्रश्‍नांपैकी तीन प्रश्‍न विद्यार्थ्यांना सोडवणे गरजेचे असते. परंतु, सोमवारी (ता.१८) झालेल्या ८० गुणांच्या सर्व्हेयिंग-१ या पेपरमध्ये चक्क चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍नच छापला नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रश्‍न कमी झाल्याने त्यांना पेपर लिहिताना तारेवरची कसरत करावी लागली. 

विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम!
प्रश्‍नपत्रिकेत हा प्रश्‍न २० गुणांचा येणे आवश्‍यक होते; परंतु तो प्रश्‍न न दिल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com