भिंत कोसळून एकजण गंभीर जखमी

संजय शिंदे
रविवार, 17 जून 2018

धारावी : मुंबईत सकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धारावी शिवशक्ती नगर, आंबेडकर चाळ येथील एका घराची भिंत आज (ता 17)  दुपारी 12 च्या सुमारास अचानक कोसळली. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक वसंत नकाशे, धारावी पोलिस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जेसू मरियन सुसै नाडर (वय 68) हे पादचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, नाडर यांचा डावा हात आणि डावा पाय फ्रँकचर झाला आहे. 

पुढील उपचारासाठी नाडर यांच्या मुलाने त्यांना अश्विनी रुग्णालय, नेवी नगर, कुलाबा येथे दाखल केले असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली. आज सकाळी जेसू नाडर हे आंबेडकर चाळ येथे आपल्या मित्राला भेटण्यासाठी पुनराज तेवर यांच्या घराजवळून जात असताना तेवर यांच्या घराची पूर्वेकडील सिंगल विटांची भिंत ही जेसू नाडर यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते गंभीरपणे जखमी झाले. सदर दुर्घटनाग्रस्त घराच्या पोटमाळ्या वरील पूर्वेकडील भिंत ही सतत पडणाऱ्या पावसामुळे जड झाली होती त्यातच पोटमाळ्याचे लोखंडी अँगलस ही सडलेले होते त्यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Web Title: One seriously injured in the collapse of the wall