पीडित महिलांचे ‘आधारघर’

‘वन स्टॉप सेंटर’च्या समुपदेशनाचा दिलासा
One stop center for women mumbai crime in mumbai against women
One stop center for women mumbai crime in mumbai against women sakal

मुंबई : वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईत महिलांविषयक अनेक गुन्हे वा हिंसक प्रकार घडत असतात. अशा घटनांमुळे मनोधैर्य खचलेल्या आणि आत्मविश्वास वा जगण्याची उमेद गमावलेल्या महिलांना केईएम रुग्णालयातील ‘वन स्टॉप सेंटर’ तीन वर्षांपासून दिलासा देत आहे. पीडित महिलांसाठी ते जणू ‘आधारघर’च झाले आहे. प्रत्येक गुन्ह्याची कायदेशीर बाब समजावून सांगून पीडितांचे समुपदेशन करत त्यांना हवी ती सर्व मदत केंद्रात केली जात आहे.

१८ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झालेल्या ‘वन स्टॉप सेंटर’अंतर्गत आतापर्यंत जवळपास ११३८ महिला आणि ८५ बालकांना दिलासा देण्यात यश आले आहे. दररोज जवळपास ६० ते ७० महिला वेगवेगळ्या कारणांनी केंद्राला भेट देत आहेत. १५ जणांची सक्षम टीम त्यांच्यासाठी काम करत आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात दोन ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत आहेत. शिवाय, येत्या काळात कामा रुग्णालयात आणखी एक केंद्र सुरू होईल. त्याचा सर्वाधिक फायदा महिलांना होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी सांगितले.

महिला आणि बालकांसाठी २४ तास कार्यरत

‘वन स्टॉप सेंटर’ महिला आणि बालविकास विभाग यांच्याअंतर्गत येत असून तो केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्प आहे. हिंसा पीडित महिला आणि बालकांसाठी ते २४ तास कार्यरत आहे. समुपदेशन, वैद्यकीय मदत, पोलिस सहकार्य, कायदेशीर मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा अशा काही सेवा केंद्रात दिल्या जातात. केंद्रावर महिला किंवा बालकांच्या गरजेनुसार काम केले जाते. समुपदेशन, मानसिक आधार आणि निर्णय घेण्याबाबत त्यांना सक्षम केले जाते. सोपी पोलिसी कार्यवाही, वैद्यकीय सुविधा, विधी सेवा इत्यादी अनेक सेवा केंद्राअंतर्गत महिला व १८ वर्षांखालील हिंसाग्रस्त बालकांना दिल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com