आटगाव ते कसारा डाऊन मार्गावर लोकलचे डबे रुळावरून घसरलेत

सुमित बागुल
Saturday, 19 September 2020

मुंबई उपनगरामधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल रेल्वेचा आज अपघात झालाय.

मुंबई : मुंबई उपनगरामधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल रेल्वेचा आज अपघात झालाय. उपनगरीय रेल्वेचे डबे रुळावरून घसरलेत. या अपघातामुळे आटगाव ते कसारा या डाऊन मार्गावरील सेंट्रल रेल्वेची उपनगरीय रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली नाही. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी : राज्यपालांवर कंगनाला भेटण्याचा दबाव होता का ? सचिन सावंत यांचा सवाल

महत्त्वाची बातमी कोकणपट्ट्यात अंबर अलर्ट जारी; मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

ही घटना आज सकाळची आहे. सकाळी ७.२० वाजता एक आसनगावहून आटगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकांचे डबे रुळावरून घसरलेत. यानंतर लगेचच रिलीफ ट्रेन ला बोलावलं गेलं. या अपघातामुळे केवळ डाऊन डाऊन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेलं नाही. याबाबतही मध्य रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

या अपघाताबाबत कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. 

One trolley of middle coach of suburban local train derailed near Atgaon station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One trolley of middle coach of suburban local train derailed near Atgaon station