कांद्याचा भाव अवघा पाच रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई - कांद्याचे मुबलक उत्पादन झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात दररोज सव्वाशे ते दीडशे गाड्या कांदा येत आहे; मात्र निर्यात ठप्प असल्याने कांद्याला उठाव नाही. परिणामी दर खाली येत चालले आहेत. गुरुवारी तर कांदा पाच ते सात रुपये किलो दराने विकला गेला. 

घाऊक बाजारात सहा महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे. माल पडून आहे, पण उठाव नाही. निर्यात सुरळीत सुरू असल्यास कांद्याला उठाव मिळतो. परंतु, निर्यातही ठप्प झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. परिणामी कांद्याचे भाव घसरत चालले आहेत. सहा महिन्यांपासून तर कांदा १० रुपये किलोच्या खालीच आहे. आजही कांदा घावूक बाजारात पाच ते सात रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच कांदा फेकून दिला आहे; तर काहींनी जाळून टाकला आहे. यामुळे वाशीतील घावूक कांदा-बटाटा बाजारातही मंदीचे वातावरण आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी कांद्याची निर्यात सुरू करण्याची गरज असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: onion Rs 5 per kg