निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्याचे अवयवदान

Organ
Organ

मुंबई - चक्कर आल्याचे कारण झाले आणि चार दिवसांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात ओंकार लुबडे या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून कुटुंबीयांनी अवयवदान केले आणि आठ महिन्यांच्या मुलीसह पाच जणांना जीवनदान दिले.

ओंकारचा बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला; त्याच दिवशी त्याचे अवयवदान झाले. त्याचा वाढदिवस गुरुवारी (ता. 30) साजरा होणार होता; मात्र, बुधवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वरळीतील बीडीडी चाळीत राहणारे लुडबे कुटुंबीय ओंकारच्या बारावीच्या निकालाची प्रतीक्षा करत होते. तो मागील गुरुवारी (ता. 23) रात्री बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे त्याला नजीकच्या ग्लोबल या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी लुडबे कुटुंबीयांना दिली. त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनी जाड होती; हा आजार दुर्मीळ आहे. त्याची अगोदर कोणतीही लक्षणे आढळत नाही, अशी माहिती ओंकारचा मोठा भाऊ नरेंद्र यांनी दिली.

मेंदूतील अतिरक्तस्रावामुळे ओंकारला सोमवारी मेंदूमृत घोषित करण्यात आले. इतर रुग्णांना नवीन जीवन देण्यासाठी आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला, असे त्याचे भाऊ नरेंद्र यांनी सांगितले. ओंकार 30 मे रोजी 17 वर्षांचा होणार होता. बारावीत त्याला 64.90 टक्के गुण मिळाले आहेत.

पाच जणांना जीवनदान
ओंकारचे हृदय कोलकाता येथील एक रुग्णाला देण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृताचे प्रत्यारोपण ग्लोबल रुग्णालयातील रुग्णावर करण्यात आले. त्याच्या यकृतामुळे आठ महिन्यांच्या बाळासह 16 वर्षांच्या मुलाला जीवनदान मिळाले आहे. दुसरे मूत्रपिंड मुंबईतील एका रुग्णालयात पाठवण्यात आले. हे मुंबईतील 39 वे अवयवदान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com