बाप रे ! केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना 1 'मास्क' पडलं सव्वा लाख रुपयांना

mass
mass

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असतानाच केईएम रुग्णालयातील एक ज्येष्ठ डॉक्टर या भामट्यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना या भामट्यांनी सव्वा लाख रुपयांचा गंडा घातला. या डॉक्टरला अमेरिकेत आपल्या मुलासाठी सॅनिटायझर, मास्क पाठवायचे होते. याच संधीचा फायदा घेत डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केईएम रुग्णालयात सेवा देणाऱ्या 60 वर्षीय डॉक्टरांची पत्नी पालिकेत नोकरीला आहे. त्यांचा 28 वर्षांचा मुलगा अमेरिकेत असून सध्या भारतापेक्षा कोरोनाची लाट त्याठिकाणी भयंकर आहे. या परिस्थितीत मुलाची गैरसोय होऊ नये, डॉक्टरांनी भारतामधून सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च इंजिनवर जाऊन कुरिअर कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. यावर मिळालेल्या क्रमांकावर डॉक्टरने संपर्क साधला कस्टमर केअरमधून बोलणा-या व्यक्तीने त्यांना गुगल पे डाऊनलोड करून त्या माध्यमातून आगाऊ रक्कम 48 हजार रुपये भरण्यास सांगितले. डॉक्टरांनी गुगल पे वरून या व्यक्तीने दिलेल्या बँक तपशिलावर पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार 29 हजार 101 रुपये पाठविले.

पैसे पाठवून बराच कालावधी उलटला तरी पार्सल घेण्यासाठी कुणीच येत नसल्याने कस्टमर केअरमधील व्यक्तीने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर डॉक्टर यांनी संपर्क साधला. मात्र, हा मोबाइल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी बँक गाठली आणि सर्व प्रकार सांगितला. बँकेतील कर्मचा-यांनी देखिल त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 50 लाख रुपये जमा होते. ही रक्कम काढली जाऊ नये यासाठी बँक कर्मचा-यांनी तत्काळ डॉक्टरांचे दुसरे खाते उघडले आणि ही रक्कम त्या खात्यात वळती केली. डॉक्टर यांच्या दुस-या बँक खात्यातून 49 हजार 996 रुपये परस्पर वळते करण्यात आले. असे सुमारे एक लाख 27 हजार रुपये भामट्यांनी काढून घेतले. डॉक्टरांनी याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, याचा अधिक तपास सुरु आहे.

Online bribe of Rs 15 lakh to KEM hospital doctor, read detail story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com