क्लासेसचं ऑनलाईन शिक्षण परवडेना, अतिरिक्त डाटा पॅकने पालकांच्या खिशाला कात्री

education
education

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील शाळा ऑनलाईन वर्ग घेत आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणात इंटरनेट डेटा पॅकचा वापर होऊ लागला. एका मोबाईल कनेक्शनला एक ते दीड जीबी डेटा मिळतो. मात्र ऑनलाईन क्लासेसमुळे हा पॅक दुपारपर्यंत संपतो. त्यामुळे पालकांना रोजच्या कामासाठी पुन्हा नेट पॅक खरेदी करावा लागत असल्याने पालकांना आर्थिक संकटाना समोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्व कार्यालये आणि कामधंदे बंद असल्यामुळे अनेक पालकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर बहुतांश कार्यालयांचे काम वर्क फ्रॉम होम सुरू आहे. पालक आणि विद्यार्थी पूर्ण दिवस घरात असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये आणि शिक्षण चालू रहावे यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केले. शाळा झुम आणि इतर अप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. हे क्लासेस संपूर्णपणे ऑनलाईन चालत असल्यामुळे यासाठी मोठ्याप्रमाणात नेट डेटा पॅक खर्च होतो. ऑनलाईन क्लासेस सुरू असताना मोबाईलमध्ये इतर अप्लिकेशन सुरू असतात. त्यामुळे एका मोबाईल कनेक्शनला मिळालेला डेटा पॅक दुपारपर्यंत संपून जातो.

एका मोबाईल कनेक्शनला एका दिवसात किमान दीड जीबी डेटा मिळतो. मात्र या ऑनलाईन क्लासेसमुळे ते तीन ते चार तासात संपून जाते. त्यानंतर मोबाईल कंपनीकडून तुमचे नेट पॅक संपले असून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नव्याने रिचार्ज करा असा मेसेज प्राप्त होतो. व्हॉट्सएप, कार्यालयाची कामे आणि ईमेल तपासण्यासाठी पालकांना पुन्हा नेट पॅक खरेदी करावा लागतो. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस हे खूप महाग पडत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत.

रोज एक जीबी डेटा मोबाईल कंपनीकडून मिळतो. पहिले आम्ही हा डेटा पूर्ण दिवस वापरायचो मात्र आता कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्या आहेत सकाळी सकाळी मुले क्लासमध्ये बसली तर बारा वाजेपर्यंत हा डेटा पॅक संपून जातो त्यामुळे आमच्या इतर कामासाठी आम्हाला पुन्हा नव्याने डेटा पॅक रिचार्ज करावा लागत असल्याचे दादा पवार यावेळी म्हणाले.

(संपादन : वैभव गाटे)

online classes lecture consume so much internet data

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com